खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचां आशीर्वाद आम्हाला मिळाला; शिंदे गटाचा दावा 

Mumbai – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena-Uddhav Balasaheb Thackeray) , असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना(Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळालं आहे. मात्र, निवडणूक चिन्हासाठी त्यांनी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळले असून, त्यांना नव्यानं तीन पर्याय द्यायला सांगितलं आहे.

दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, मी खूप समाधानी आहे आणि खूप आनंदही झालेला आहे की जे तत्त्व, बाळासाहेबांचं हिंदूत्व घेऊन आम्ही जे पुढे चाललो आहोत आणि तेच नाव आम्हाला मिळालं आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे.

चिन्हांबाबत निवडणूक आयोगाकडून आम्हाला उद्या सकाळपर्यंत वेळ मिळालेली आहे आणि तोपर्यंत आम्ही विचारविनीमय करून चिन्ह देऊ. जी भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो, जो उठाव केला होता. बाळासाहेबांचं हिंदूत्वाचं तत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार. तेच नावा आता आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचां आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. असं ते म्हणाले.