कविता शेअर केल्याने अटक होते मग हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीचे काय ?

पुणे – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (Kalva Police Staion) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आणखी काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या सर्व घडामोडींवर आता प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य (Famous author Shefali Vaidy) यांनी आपले मत मांडले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात,  एका अभिनेत्रीने ‘कविता’ (‘Poetry’) म्हणून जे काही शेअर केलेलं आहे त्यातली भाषा (Language) आणि आशय दोन्ही अत्यंत खालच्या दर्जाचं आहे ह्यात वादच नाही, पण म्हणून लगेच अटक ? एका कवितेने कुणाच्या भावना दुखावल्या म्हणून एखाद्या व्यक्तीला ह्या महाराष्ट्रात अटक होऊ शकते तर मग ‘साल्यांनो, तुमच्या देवांचा मी बाप आहे’, ह्या मूळ कवितेत नसलेल्या शिवराळ ओळी घुसडून पूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीचे काय ?

छत्रपती संभाजी महाराजांना (Sambhaji Maharaj) ज्याने ते मुसलमान होत नाही म्हणून अनन्वित छळ करून जीवे मारले त्या क्रूरकर्मा औरंगझेबाच्या (Aurangzeb) मढ्यावर तो अकबर ओवैसी (Akabar Owesi) महाराष्ट्रात येऊन, इथल्या शिवभक्तांच्या नाकावर टिच्चून फुले वाहतो, तेव्हा कुणाच्याच भावना कश्या दुखावत नाहीत ? त्याला का अटक होत नाही ? केवळ दुसऱ्या कुणाची कविता शेर केली म्हणून एका स्त्रीला बलात्काराची (Rape) धमकी देणाऱ्या लोकांचे काय ? त्यांना काही शिक्षा होणार आहे का ? की अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त गावगुंडांनाच आहे आजच्या महाराष्ट्रात ? त्या ‘कवितेच्या’ निमित्ताने अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून ते समर्थ रामदासांपर्यंतच्या सर्व हिंदू लोकांना पूजनीय असलेल्या संत कवींवर जे गरळ ओकलं जातंय त्याचं काय ?

कविता वाईटच आहे, पण त्या कवितेतल्या भाषेपेक्षा कितीतरी जास्त घाण, शिवराळ भाषेत केवळ एका बाईचाच नव्हे तर तिच्या आई-वडीलांचा, हिंदू समाजाच्या दैवतांचा अपमान केला जातोय आणि तो करणारे बरेच गावगुंड आपापल्या डीपी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) फोटो मिरवतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एका स्त्रीची अब्रू लुटली म्हणून महाराजांनी रांझ्याचा पाटलाचा चौरंग केला, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून आपल्या आईची आठवण काढली ह्या कथा नुसत्याच तोंडाने सांगायच्या का ? एका पक्षातर्फे व्यवस्थित सही-शिक्क्यानिशी पत्रक-बित्रक काढून त्यांच्या नेत्याचा ‘अवमान करणाऱ्या सामान्य माणसांना झोडा’ हा रीतसर आदेश दिला जातो. त्यांच्यावर काही कारवाई (Action) होणार की नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.