सरकार वाचले पण अब्रू गेली : सत्ता संघर्षाचा निकाल देताना कोर्टाने कोश्यारींना झाप झाप झापले

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नाही, व्हीपचा अधिकार पार्टीच्या नेत्याकडे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर मात्र न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Former Governor Bhagat Singh Koshyari) यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता असं कोर्टाने म्हटले आहे. कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही असं कोर्टाने म्हटले आहे.

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे होते… मात्र, नंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने तेव्हाची स्थिती आता निर्माण केली जाऊ शकत नाही… त्यामुळे नंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पाचारण करणे योग्य व न्याय्य होते असे देखील कोर्टाने म्हटले आहे.