Mahesh Tapase | आमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी संबोधणारे अमित शाह कोण? महेश तपासे यांची संतप्त प्रतिक्रिया

Mahesh Tapase | आमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी संबोधणारे अमित शाह कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

आमच्यातल्या काही नकली नेत्यांना भारतीय जनता पार्टीने या आधीच स्वतःच्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतले आहे व त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करण्याचे कुठलेही कारण नसल्यामुळे अमित शहा (Amit Shah) यांनी पवार साहेबांचे कर्तुत्व काय असा अतिशय हास्यस्पद प्रश्न निवडणूक सभेदरम्यान विचारला अशी टीका तपासे यांनी गृहमंत्र्यांवर केली.

महाविकास आघाडीचा मोठा धसका भारतीय जनता पार्टीने घेतला असून महायुतीच्या जागा वाटपाबाबत नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादीच्या मध्ये प्रचंड नाराजगी निर्माण झाली आहे. ह्या नाराजगी कडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून शहा साहेबांनी पवारांचे कर्तुत्व काय हा प्रश्न विचारला असेही महेश तपासे म्हणाले.

महाराष्ट्रात आल्यावर पवारांवर टीका केली नाही तर मथळे तयार होत नाही आणि म्हणूनच जुमला पार्टीच्या नेत्यांना पवारांवर काहीतरी बोलावं लागतं परंतु महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला पवार साहेबांचं राज्यासाठी काय योगदान आहे याची पूर्ण कल्पना आहे असा टोला महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते