एमआयएम’ गुगल मॅपविरोधात आक्रमक, तक्रार दाखल करणार

Sambhajinagar : सध्या औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव बदलण्यास एमआयएमचा विरोध आहे. यातच आता या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर गुगल मॅपवर (Google Maps) आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे.

दरम्यान, गुगल मॅपवर संभाजीनगर असे अपडेट झाल्याने  एमआयएम आक्रमक झाली असून, पक्षाच्यावतीने गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. बेकायदेशीर कृत्य करणे, सामाजिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या कलमानुसार तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासोबतच न्यायालय आणि केंद्रीय यंत्रणांकडे देखील तक्रार नोंदवणार असल्याचे एमआयमएमने म्हटले आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, तेव्हा देखील एमआएमच्या वतीने विरोध करण्यात आला होता.