Abhishek Ghosalkar यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिसभाई कोण होता?

Abhishek Ghosalkar : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot dead in Mumbai) यांची पैशाच्या वादातून गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. दहीसरमध्ये ही घटना घडली. माॅरिस नोरोन्हा(Maurice Noronha) असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर केले. यानंतर त्याने स्वत:वर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. दरम्यान, या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. लोकसत्ताच्या वृत्तानुसार, नरोन्हा हा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये कार्यरत नव्हता, हे प्राथमिक माहितीवरून दिसून येत असून तो आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत काही सामाजिक कामे करीत होता. करोनाकाळात नोरोन्हाने सामाजिक संस्थेद्वारे कार्य सुरू केले होते.

एका प्रकरणात नरोन्हाविरुद्ध घोसाळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या रागातून नोरोन्हाने गोळीबार केला का, हे तपासण्यात येत आहे. मात्र नरोन्हाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार गीता जैन आदी राजकीय नेत्यांबरोबरची जुनी छायाचित्रे प्रसिद्धीमाध्यमे व समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहेत. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला, तरी नेत्यांकडे त्याचे जाणे-येणे होते, अशी माहिती पुढे आली आहे. आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्याने काही नेत्यांना आमंत्रित केले होते. राज्यात राजकीय नेत्यांवर गोळीबाराच्या घटना काही दिवसात घडल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ