कोण अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार – नवाब मलिक

मुंबई – ‘सत्यमेव जयते’ असं बोलत उच्चन्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना कुणी गैर करत असेल… कोण अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे असे स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.

समीर दाऊद वानखेडे याच्या वडिलांनी नवाब मलिक यांना कुटुंबाच्या विरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्यापासून रोखता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.

या देशामध्ये बोलण्यावर बंदी कुणी घालू शकत नाही. जर एखादी व्यक्ती जबाबदारीने बोलत असेल तर प्रत्येक नागरिकाचा तो मौलिक अधिकार आहे परंतु काही लोकांना हे कळलं नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

Next Post

‘इंडियन आयडल मराठी’ च्या ऑडिशनला दुमदुमला महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतील आवाज

Related Posts
हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार

हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर (BJP Meeting) आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपमध्ये दोन दिवस…
Read More
शेतकरी व नागरिक यांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार- Chhagan Bhujbal

शेतकरी व नागरिक यांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार- Chhagan Bhujbal

 Chhagan Bhujbal: शेतकरी व नागरिक याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून विकासाची कामे ही अविरतपणे सुरू ठेवाणार आहे.असे…
Read More
pratik karpe

भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी प्रतिक कर्पे यांची निवड

मुंबई : भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची पक्षाकडून आज घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी पदी भाजपा मुंबई…
Read More