Manoj Jarange | मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीकडून जालन्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सध्या चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीने जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मविआ नेत्यांसमोर ठेवला आहे.

वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी आमच्याजवळ उशी कुठलीही मागणी केलेली नाही. हा वंचितचा पुढाकार आहे. मविआने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कॉमन कँडिडेट म्हणून जाहीर करावं, अशी आमची इच्छा आहे.दरम्यान, मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबत संजय राऊत म्हणाले, आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही महाविकास आघाडीत केवळ जागावाटपावर चर्चा करत आहोत.

दरम्यान,आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांची बुधवारी सायंकाळी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीदेखील हजर होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मविआकडे लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २७ जागांची मागणी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव