दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ? देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी  घोषणा

मुंबई : खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case)  प्रकरणावरून   विधानसभा आणि विधानपरिषदेत आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केलीय.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर  दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत (Special Task Force)  चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी  विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.  ज्यांच्याकडे याचे  पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग (Sushant Singh Rajput) यांची केस सीबीआयकडे (CBI) होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.