Poonam Mahajan : उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांनाच तिसऱ्यांदा संधी दिली जाणार?

Poonam Mahajan : उत्तर मध्य मुंबईतला उमेदवारीचा तिढा अखेर मिटण्याची शक्यता आहे. कारण भाजप पुन्हा एकदा विद्यमान खासदार पूनम महाजन (Poobam Mahajan) यांनाच उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पूनम महाजन या मतदारसंघाचं १० वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली होती. भाजपनं दुस-या उमेदवाराची शोधाशोध सुरू केल्याची चर्चा रंगली होती. मात्र पूनम महाजन यांनाच तिस-यांदा संधी दिली जाणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथसिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह समितीचे सदस्य आणि राज्यांतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. समितीने तीन तासांहून अधिक काळ उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली.

दुसरीकडे काँग्रेसने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उत्तरप्रदेशचे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह मध्य प्रदेशातील राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने काल 46 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार