Moscow Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन पुन्हा आमने-सामने 

Russia-Ukrain War : रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या क्रोकस सिटी हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Moscow Terrorist Attack) मृतांची संख्या 133 वर पोहोचली आहे. रशियन तपास समितीचा हवाला देत तास या वृत्तसंस्थेने शोध मोहीम सुरू असल्याचं म्हटलं आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 147 लोक जखमी झाले आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटशी संलग्न इस्लामिक स्टेट खोरासानने घेतली असली तरी रशियन सुरक्षा सेनेनं दावा केला आहे की हल्लेखोरांचा युक्रेनशी संबंध होता आणि हल्ल्यानंतर ते शेजारच्या देशात जात होते. या हल्ल्यात युक्रेनच्या सहभागाचे आरोप हास्यास्पद असल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान इस्लामिक स्टेट खोरासानचा दावा विश्वासार्ह असून या हल्ल्यांना युक्रेन जबाबदार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार