मनोज जरांगेंनी तडीपार करण्यासारखं काम कुठे केलंय – Devendra Fadnavis

Devendra Fadnavis on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी तडीपार करण्यासारखं काम कुठे केलंय, असं फडणवीसांनी म्हटलंय. आमचे हितचिंतक जरांगेंना जाऊन काहीही सांगत असतात, असंही फडणवीस म्हणाले. मनोज जरांगेंनी माध्यमांसमोर केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी त्यांना टोला लगावलाय.

माझ्यावर गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आमचे खूप हितचिंतक आहे, ते जाऊन जरांगेंना काही सांगत असतात, ते त्याच्यावर बोलतात असं कोणी कुणाला तडीपार करतं का? तडीपार करण्यासारखं त्यांनी काम केलं आहे का त्यांच्यावर तशा केसेस आहेत? असंही काही नाहीये. अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घ्या, असे काही जण असतात. ते जाऊन त्यांना फिडिंग करतात’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार