Pakistani Cricketers Indian Wife: भारतीय महिलांच्या प्रेमात क्लिन बोल्ड झाले ‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्स

Pakistani Cricketers Indian Wife: भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. जेव्हा दोन्ही देश मैदानावर भिडतात तेव्हा संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष लागते. नुकतेच वनडे विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते. पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे त्यांच्या देशातच नव्हे तर भारतातही खूप चाहते आहेत. याच कारणामुळे काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे. यामध्ये माजी दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटू झहीर अब्बाससह चार क्रिकेटपटूंचा समावेश आहे. चला जाणून घेऊया या क्रिकेटपटूंबद्दल.

1. झहीर अब्बास आणि रीटा लुथरा
झहीर अब्बास (Zaheer Abbas) हा त्याच्या काळात पाकिस्तानच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. त्याने 1980 च्या दशकात ग्लुसेस्टरशायरकडून काउंटी करारही मिळवला. जेव्हा तो एका स्पर्धेत खेळण्यासाठी युनायटेड किंगडममध्ये होता, तेव्हा त्याच देशात इंटिरिअर डिझायनिंगचे शिक्षण घेत असलेल्या रिटा लुथराशी त्याची भेट झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 1988 मध्ये लग्न केले.

पाकिस्तानी वृत्तपत्र द नेशनच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नासाठी फारसा विरोध केला नाही आणि अब्बासचे वडीलही रीटाच्या वडिलांचे मित्र होते. नंतर रीटाने धर्म बदलला आणि तिचे नाव बदलून समिना अब्बास ठेवले. झहीर अब्बास आणि रिटा सध्या कराचीमध्ये राहत आहेत. रिटा इंटिरिअर डिझायनिंगही करत आहे. झहीरने लग्नानंतर काही वर्षांनी खेळातून निवृत्ती घेतली.

2. मोहसिन खान आणि रीना रॉय
मोहसीन खानची (Mohsin Khan) गणना पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याने 1977 ते 1986 दरम्यान 48 कसोटी आणि 75 एकदिवसीय सामने खेळले. त्याच्या कसोटीत 2709 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 1877 धावा आहेत. मोहसिनने 1983 मध्ये भारतीय अभिनेत्री रीना रॉयशी लग्न केले, परंतु 1990 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांची भेट भारतात झाली. त्यानंतर मोहसीन भारतीय चित्रपटांमध्ये काम करत होता. मोहसीनचा पहिला चित्रपट बटवारा होता. यानंतर ‘साथी’ही हिट ठरला. रीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर मोहसीन सध्या कराचीमध्ये राहत आहे. मोहसीन आणि रीना यांना सनम नावाची मुलगी आहे. सनम रीना रॉयसोबत राहत आहे.

3. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले. सानिया (Sania Mirza) आणि शोएबची भेट ऑस्ट्रेलियात झाली होती. जिथे दोघांनाही कळले की दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्यांना एक मुलगा इझान मिर्झा देखील आहे.

4. हसन अली आणि शामिया आरजू
हसन अलीने (Hasan Ali) 2019 मध्ये भारतातील हरियाणातील नूह जिल्ह्यातील रहिवासी शामिया आरजूशी लग्न केले. शामिया व्यवसायाने एरोनॉटिकल इंजिनिअर आहे. दोघांचे लग्न दुबईत झाले. हसन अलीच्या म्हणण्यानुसार, शामिया आरजूसोबत त्याची पहिली भेट एका डिनर दरम्यान झाली होती. दोघेही काही काळ एकमेकांना भेटले आणि नंतर हसन अलीने शामियाला प्रपोज केले. शामियाचा आवडता फलंदाज विराट कोहली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit Patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित