शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंना जिवे मारण्याची धमकी 

मुंबई : राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेत (Shivsena) यादरम्यान मोठी फुट पडल्याचे दिसत आहे. यातच आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्याची घटना ताजी असताना आता शिंदे गटातीलच आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांना जीवे मारण्याच्या धमक्या येवू लागल्या आहेत. या संदर्भात भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी गावदेवी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे तक्रार दिली आहे.

विकास गोगावले (Vikas Gogawale) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील दोन दिवसांपासून मला व माझ्या वडिलांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी फोन कॉल येत आहेत. काही दिवसांपूर्वी माझे वडील आमदार भरत गोगावले यांना सुद्धा अशा प्रकारे फोन आले होते. मात्र त्यावेळी आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता पुन्हा फोन कॉल सुरू झाले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.