शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का? नितेश राणे यांचा खोचक सवाल 

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावून आपले मत व्यक्त केले होते मात्र आता असंच काहीसे आता ठाकरे गटात देखील सुरु झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  हे नुकतेच  नागपूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीच या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूरात झळकलेल्या बॅनरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.

आदित्य ठाकरे यांचे नागपूरात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे या पोस्टर्सनी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का?, हा विचार करून बॅनर लावावेत, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणालेत.

या सोबतच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. तुझ्या मालकाने नवीन मातोश्री का बांधली? देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, काँग्रेस समोर झुकणारे हिXX असतात. मग आता तुम्ही काय करताय?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.