प्रसिद्ध मॉडेलच्या आत्महत्येप्रकरणी सनरायझर्स हैद्राबादच्या आयपीएल स्टारचे नाव आले समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आयपीएल (IPL 2024) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आत्महत्या प्रकरणात अडकला आहे. सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. तानियाचा शेवटचा कॉल अभिषेक शर्माला आला होता असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वास्तविक, मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी मॉडेल तानियाने रात्री उशिरा राहत्या घरी आत्महत्या केली होती. तानिया सुमारे दोन वर्षांपासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेत होती. मॉडेल तानियाने आत्महत्या केल्यानंतरच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान तानियाचा फोन तपासण्यात आला. यावेळी कॉल लॉगमधील शेवटचा कॉल अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) करण्यात आल्याचे दिसले.

माध्यमातील वृत्तानुसार, तानियाच्या कॉल डिटेल्समध्ये अनेक गुपिते दडलेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय तिचा शेवटचा फोनही अभिषेक शर्मालाच होता हेही समोर येत आहे. या आधारे पोलिसांनी अभिषेक शर्माला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याचबरोबर पोलीस इतर पैलूंचाही तपास करत आहेत. तानियाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या तर केली नाही ना, या दृष्टिकोनातून पोलीस सध्या तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल