अभिनेता अनिकेत विश्वासराववर पत्नीचा गळा दाबल्याचा आरोप

पुणे – मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, )यांनी फिर्याद दिली आहे.

स्नेहा चव्हाणही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलंय. करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भितीने जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केला हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचं तिने फिर्यादीत म्हटलं आहे.  अनिकेत विश्वासराव याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत विश्वासराव हा मुळचा मुंबईचा आहे़ गेल्या काही दिवसांपासून स्नेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. स्रेहा हिने अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका माध्यमातून अभिनेता म्हणून सर्वपरिचित आहे. सुधीर मिश्राच्या चमेलीमधून त्याने पर्दापण केले आहे. लपून छपून या मराठी चित्रपट सृष्टीत पर्दापण केले आहे. अनिकेत यांच्यासह चंद्रशेखर रघुनाथ विश्वासराव आणि अदिती चंद्रशेखर विश्वासराव यांच्या विरुद्ध देखील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.