आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई प्रवाशांची अद्ययावत माहिती मिळाल्यास संसर्गाला रोखणे सोपे जाईल –  ठाकरे

Uddhav Thackeray & Corona

मुंबई – कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली.  यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत.  सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही.  सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे.

केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असे सांगितले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Next Post
Uddhav Thackeray

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Related Posts
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा; भाजपला मोठा दिलासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा; भाजपला मोठा दिलासा

MNS News : हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो…
Read More
रामदास आठवले

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी दोषी गुन्हेगारास फाशीची शिक्षा करावी –  रामदास आठवले

मुंबई  :  अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता झिशान खान जबाबदार असून त्यास कठोर शिक्षा करावी अशी तुनीषा…
Read More
चीनमधील व्हायरसचा भारतात प्रसार, कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका चिमुकल्याला लागण

चीनमधील व्हायरसचा भारतात प्रसार, कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका चिमुकल्याला लागण

चीनमध्ये पसरणारा ह्युमन मेटाप्युमोव्हायरस ( HMPV Virus) संसर्ग भारतात पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतीय वैद्यकीय…
Read More