लातूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी अफसर शेख तर प्रदेश सरचिटणीसपदी रवींद्रनाना पाटील यांची नियुक्ती

Latur District President – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने पक्षाच्या लातूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी अफसर शेख यांची नियुक्ती करण्यात आली तर रवींद्रनाना पाटील यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

पक्ष संघटना वाढविण्यासाठी अफसर शेख आणि रवींद्रनाना पाटील यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी