Baramati LokSabha | अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग, विजय शिवतारेंच्या खुलास्यामुळे एकच कळबळ

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. बारामतीत महायुतीतून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीतून खासदार सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळू शकते. मात्र शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी अजित पवारांचा सूड घेण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचेही म्हटले. दरम्यान आता बारामतीच्या (Baramati LokSabha) जागेवरून अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्लॅकेमल करत असल्याचा गौप्यस्फोटच शिवतारे यांनी केला आहे.

विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती? असं अजितदादा बोलले होते. माझा नाही अवाका तर कशाला धडपड करतो? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू? असा इशारा देतो. कशाला करतो? लढ ना तुझ्या ताकदीवर, असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा जनतेला आहे. जनता सांगेल ते करणार. महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन-चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी