Vijay Shivatare | महायुतीनं अजित पवारांना बारामतीची जागा सोडली तरी त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतरही विजय बापू शिवतारे (Vijay Shivatare) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला, मागील काही दिवसांपासुन शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येताहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होईल असं जवळपास निश्चित मानलं जातंय. अशातच विजय बापू शिवतारे यांनी देखील बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला.

एकीकडे अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे विजय शिवतारे यांच्या निर्णयाने अजित पवारांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वादावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारेंसोबत तब्बल दीड तास चर्चा केली. युतीधर्म पाळायला हवा, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.

मात्र मी जरी लढलो नाही तरी अजित पवार निवडून येणार नाहीत अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी दिलीय, मात्र मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही अशी भूमिका शिवतारे यांनी दिलीय त्यामुळे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. महायुतीनं अजित पवारांना बारामतीची जागा सोडली तरी त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही,” असं म्हणत आपण अजित पवारांविषयी मवाळ भूमिका घेणार नसल्याचं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका