Baltimore | अमेरिकेत मोठी दुर्घटना, जहाजेच्या धडकेमुळे अख्खा पूल कोसळला, भयानक दृश्य कॅमेरात कैद

Baltimore Francis Scott Key Bridge Collapse : अमेरिकेतील बाल्टिमोरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे पाटापस्को नदीवर बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाला जहाजाने धडक दिली. या धडकेनंतर पूल कोसळला. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अपघात झाला तेव्हा पुलावरुन अनेक वाहने जात होती.

बाल्टीमोरमधील (Baltimore) पॅटापस्को नदीवर बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला मालवाहू जहाजाची टक्कर झाली, त्यानंतर पूल पाण्याखाली गेला. हा पूल कोसळल्याने अनेक वाहने आणि लोकही नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलावरून जाणारे सुमारे 20 लोक आणि अनेक गाड्या नदीत पडल्या आहेत.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर स्थानिक अग्निशमन विभागाने या घटनेला दुजोरा दिला असून बाल्टिमोर पूल कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे सांगितले आहे. मात्र, या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल तीन किमी लांबीचा आहे.

पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. जहाजाची टक्कर झाली त्या वेळी पुलावरून लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू होते ज्याने या भीषण घटनेचे छायाचित्रण केले. माहिती मिळताच यूएस कोस्ट गार्ड आणि मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार या जहाजावर सिंगापूरचा ध्वज होता. दाली असे या मालवाहू जहाजाचे नाव असून ते 948 फूट लांब आहे. ते बाल्टिमोरहून कोलंबोला जात होते. मात्र, हा निष्काळजीपणा होता की काही षडयंत्र, हा अपघात कसा झाला हे तपासानंतरच समोर येईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय