अमिताभ बच्चन यांच्यासह काम केलेल्या अभिनेत्यावर चोरीचा आरोप, पोलिसांनी केली अटक

Priyanshu Kshatriya Arrest: बॉलीवूड इंडस्ट्रीतील महान कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मराठी फिल्म ‘झुंड’ (Jhund) मध्ये काम केलेला अभिनेता प्रियांशु क्षत्रिय याच्याबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. प्रियांशुवर चोरीचा आरोप असून नागपूर पोलिसांनी त्याला अटक केले आहे. यापूर्वीही चोरी प्रकरणात प्रियाशुंचे नाव आले होते.

काय आहे पूर्ण प्रकरण?
झुंड सिनेमात महत्त्वाची भूमिका करणारा प्रियांशु याच्याविरोधात नागपुर पोलिस स्टेशनमध्ये चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला अटक केले आहे. नागपूर पोलिसातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, नागपूर शहरातील मानकापूर भागातील निवासी प्रदीप मंडावे यांच्या घरी नुकतीच ५ लाख रुपये आणि मौल्यवान दागिन्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी प्रदीप यांनी नागपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. ज्यामध्ये त्या अल्पवयीन संशयिताने अभिनेता प्रियांशुच्या नावाचा खुलासा केला आणि सांगितले की या चोरीत त्याचादेखील हात आहे. मग पोलिसांनी विनाविलंब प्रियांशुला अटक केली व त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने १८ वर्षीय प्रियाशुंला पोलिस कस्टडीत राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी माहिती दिली आहे की, चोरीचा सर्व माल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

प्रियांशू क्षत्रियचे नाव यापूर्वीही चोरीमध्ये आले होते
याआधीही ‘झुंड’ चित्रपटातील स्टार प्रियांशू क्षत्रिययाचे नाव रेल्वेतील मोबाईल चोरीच्या प्रकरणाबाबत समोर आले होते. खरे तर नागपूर रेल्वे पोलिसांनी गेल्या वर्षी रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीत प्रियांशू क्षत्रियचाही सहभाग होता, त्यानंतर प्रियांशूला अटक करण्यात आली होती.