Asaduddin Owaisi | पीएम मोदी, उद्धव ठाकरे जो कुर्ता घालतात, तो बाबराने भारतात आणला होता

Asaduddin Owaisi : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची महाराष्ट्रातील अकोला येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

“इथे किती लोक कुर्ता घालून आले आहेत. मोदीपण कुर्ता घालतात. उद्धव ठाकरे पण कुर्ता घालतात. इम्तियाज जलिल कुर्त्यामध्ये चांगले दिसतात. हा कुर्ता कुठून आला माहिती आहे का? हा कुर्ता बाबराने आणलेला आहे. कांदा सगळे खातात ते कोणी दिला. औरंगजेबाने दिला. आता तुम्ही सांगत आहात की, देशात राहायचे असेल तर असे वागा. तुम्ही कुर्ता कशाला घालता. कुर्ता घालूच नका. आम्हाला मुघलांशी काही देणेघेणे नाही”, असे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा