Ashok Chavan यांची कन्या श्रीजया आता विधानसभा निवडणूक लढवणार?

Ashok Chavan Daughter: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात भाजपा आणि महायुतीला बळ मिळेल असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या राजकीय कारकिर्दीची ही नवी सुरुवात असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता त्यांची मुलगी श्रीजया यांची देखील चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. आता चव्हाण यांच्या जागी श्रीजया यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जयाची कारकिर्द नेमकी कशी आहे, श्रीजया वडिलांची जागा घेणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राहुल गांधींची पहिली भारत जोडो यात्रा मराठवाड्यातून गेली होती. यावेळी देगलूरपासून श्रीजया चव्हाण (Srijaya Chavan) राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासोबतचा जया यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच जया हिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. जर चव्हाण हे राज्यसभेवर गेले तर त्यांच्या जागी त्यांची मुलगी आता विधानसभा निवडणूक लढवणार का हा मुद्दा चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!