Sanjana Ganeshan | ‘वहिनी जाड दिसत आहेत’, बुमराहच्या पत्नीला मोठी म्हणाला चाहता; संजनाने दिले सणसणीत उत्तर

Sanjana Ganeshan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवार 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत आधीच अनेक गुंतागुंत निर्माण झाली होती. केएल राहुल संघाबाहेर असून श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले आहे. केएस भरतही फॉर्ममध्ये नाही, दरम्यान जसप्रीत बुमराहबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह संघासह राजकोटला पोहोचलेला नाही. मंगळवारी जसप्रीत बुमराहने संघासोबत सराव सत्रातही भाग घेतला नाही. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला यादरम्यान विश्रांती दिली जाऊ शकते, असे आधीच बोलले जात होते.

एकीकडे बुमराह राजकोट कसोटीसाठी अनुपस्थित असल्याची चर्चा सुरू असताना बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे. बुमराहने या खास दिनानिमित्त पत्नी संजनाला प्रेमळ शुभेच्छा दिल्या. दोघांचेही रोमँटिक फोटो बुमराहने इंस्टाग्रामवर शेअर केले. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला. मात्र एका इंस्टा युजरने संजना गणेशनवर बॉडी शेमिंगसंबंधी कमेंट केली, ज्यानंतर संजनाने त्याला खूप फटकारले आहे.

युजरने टिप्पणी केली की, वहिनी जाड दिसत आहेत. त्यावर संजनाने लिहिले, तुम्हाला शाळेतील विज्ञानाचे धडे नीट आठवत नाहीत आणि आलात मोठे स्त्रियांच्या शरीरावर भाष्य करायला. चल पळ इथून… संजना गणेशनच्या या उत्तराचे सर्वजण कौतुक करत आहेत. दरम्यान संजना एका मुलाची आई बनली आहे, त्यामुळे गरोदरपणात तिचे वजन वाढणे स्वाभाविक आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!