मिंधे आणि पवारांप्रमाणे चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

Ashok Chavan : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असताना आता आणखी एक मोठी बातमी येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना  पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अशोक चव्हाण यांच्या निर्णयानंतर मोठी भीती व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया