मुंबईतील ‘या’ धडाडीच्या महिला नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश 

मुंबई – मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५६ च्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी त्यांच्यासह उपविभाग प्रमुख अशोक परशुराम माटेकर, शाखा प्रमुख नितीन शंकर चव्हाण यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चांदीवली विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रश्न नक्की तडीस लावू असे सांगून यावेळी आशवस्त केले.

यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाठ, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक  नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर हेदेखील उपस्थित होते.