विषय आहे का! पाकिस्तानचा माजी क्रिकेटरही रोहितच्या कॅप्टन्सीचं कौतुक करायला भाग पडला, म्हणाला…

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे.

भारताच्या शानदार विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) झी न्यूजच्या क्रिकेट शो ‘द क्रिकेट शो’शी संवाद साधला आहे. टीम इंडियाच्या या चमत्कारी विजयानंतर शोएब अख्तरने रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं कौतुक केलं आहे. अख्तर म्हणाला, ‘रोहित शर्मा… गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हरवलेला प्रतिभाशाली कर्णधार, आज तुम्हाला तो सापडला आहे.’

शोएब अख्तर म्हणाला, ‘रोहित शर्माच्या गोलंदाजीतील बदल बघा, टीम इंडियाला सांभाळण्याची त्याची पद्धत बघा आणि त्याचे कॉम्बिनेशनही खूप चांगले झाले आहे. आज तुम्ही जिंकलात म्हणून मी हे म्हणत नाही. तुम्ही कुलदीप यादवला आणले म्हणून मी हे सांगत आहे. कुलदीप यादवला आणणे म्हणजे तुमचा मेंदू कार्यरत आहे. टीम इंडियाने आशिया चषक 2023 कसा जिंकला याकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाने आता संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे की, या कॉम्बिनेशनमुळे वर्ल्डकपदरम्यानआपल्याच मायभूमीत भारत इतर संघांसाठी किती धोकादायक सिद्ध होईल.’

टीम इंडियाबद्दल शोएब अख्तर म्हणाला, ‘आता विश्वचषकात तुम्ही एकामागून एक मॅच जिंकत राहता त्याच दमदार टोन आणि फास्ट बॉलिंग कॉम्बिनेशनने आम्ही सेमीफायनलमध्ये इंशाअल्ला तुमची भेट घेऊ. मी तुम्हाला पाकिस्तान विसरु देणार नाही. टीम इंडिया सध्या फिरकीपटूंनी भरलेली आहे. फलंदाज पूर्ण आहेत आणि मधली फळी उत्कृष्ट आहे.पाकिस्तानला फिरकीपटूंचा मुद्दा आहे. मधल्या फळीची समस्या आहे आणि सर्वात मोठी समस्या दुखापतीची आहे. सध्या टीम इंडिया खूपच चांगल्या स्थितीत असून आशिया कप जिंकला आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण