बाबर आझमचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; आपल्याच सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अश्लील कृत्य केले

Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सतत अपयशी ठरत असल्याने तो अडचणीत आला आहे. आता त्याच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले असून त्याचे वैयक्तिक अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्याच सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत असे अश्लील कृत्य केले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. (Babar Azam’s obscene video goes viral).

समोर आलेल्या माहितीनुसार, बाबरचे पर्सनल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. कथित स्वरूपात तरूणीने बाबर आझमवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. बाबर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही केला जात आहे.

https://twitter.com/niiravmodi/status/1614709104949465088?s=20&t=JaHypBkNFVzzPHTHukThPQ

 

ट्विटरवर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती बाबर आझम असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला होता, जो eish.arajput1 अकाऊंटने शेअर केल्याचे दिसत आहे. आता या सर्व गोष्टींमुळे बाबरवरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.