IND vs ENG | दहशतवादी पन्नूने रांचीतील भारत-इंग्लंड सामना रद्द करण्याची दिली धमकी, गुन्हा दाखल

IND vs ENG : शीख फॉर जस्टिसचे प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (JSCA) च्या स्टेडियमवर 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान होणारा भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी क्रिकेट सामना रद्द करण्याची धमकी दिली आहे. पन्नूने यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओद्वारे भारतातील प्रतिबंधित संघटना सीपीआय माओवाद्यांना सामना रद्द करण्याचे आवाहन केले आहे.

झारखंड आणि पंजाबमध्ये वादळ निर्माण करा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टॉक यांना सामना खेळू देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्याने इंग्लंड संघाला माघारी जाण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी रांचीच्या धुर्वा पोलिस स्टेशनमध्ये तैनात इन्स्पेक्टर मदन कुमार महतो यांच्या वक्तव्यावरून 19 फेब्रुवारीला एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पन्नूने भारतात दहशत पसरवण्याचा आणि आदिवासींच्या मनात सरकारबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे इन्स्पेक्टर महतो यांनी तक्रारीत लिहिले आहे. त्यांचा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे कृत्य यूएपी कायदा, आयटी ॲक्ट अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

आदिवासींच्या जमिनीवर क्रिकेट खेळू देऊ नये, असे आवाहनही पन्नूने माओवाद्यांना केले आहे. इन्स्पेक्टरने तक्रारीत लिहिले आहे – दोन मित्र देशांमधील क्रीडा संबंध बिघडवण्यासाठी आणि बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात वादळ निर्माण करण्यासाठी इंटरनेट मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ जारी केल्याने परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याने भारत सरकार आणि बीसीसीआयचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल