Gram Panchayat Election Result : बारामतीमध्ये अजित पवार यांचीच हवा; आठही ग्रामपंचायतीवर दादा गटाचे वर्चस्व

Maharashtra Gram Panchayat Election Result 2023 : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल हाती येत असून भाजपची यात दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. केवळ भाजपच नव्हे तर भाजपचे प्रमुख मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील आपली ताकत दाखवून दिली आहे. या निवडणुकीत विरोधकांना म्हणावे तेवढे जनतेचे समर्थन मिळाले नसल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार, बारामतीमधील 8 ग्रामपंचायतींपैकी 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाच वर्चस्व. अजित पवार गटाची सत्ता आली आहे. दुसरीकडे कोल्हापूरच्या चिंचवाडमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांना नाकारलं. चिंचवड ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार श्रद्धा पोतदार सरपंच झाल्या. तर कोल्हापुरातील राधानगरी पालकरवाडीत लोकनियुक्त सरपंच महेश नामदेवराव भोईटे (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी झाले आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 74 टक्के मतदान रविवारी झाले होते. अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. शिवसेना-भाजपसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. अनेक बड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपला सक्रीय सहभाग दाखवला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील यासह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी