सरकारने शेतकऱ्यांची राखरांगोळी केली- खासदार अमोल कोल्हे

Amol Kolhe: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. केंद्र सरकारकडून ७ डिसेंबरला कांदा निर्यातबंदी करण्यात आली, त्यानंतर आज २३ वा दिवस आहे. या २३ दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राच्या सरकार समोर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारायची हिंमत झाली नाही, असा हल्लाबोल आक्रोश मोर्चाच्या समारोप वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी केला.

पुढे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, स्वाभिमानाची आणि संघर्षाची आम्ही वाट निवडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत आहे. पण शिरूरमध्ये येण्याआधी शेतकऱ्यांना दिलासा देणारे जीआर गेऊन या नाही तर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तुमच्या कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे होतात मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी का नाही? दिल्लीचे राज्यसरकारचे नेते मांडलिक झाले, लाचार झाले आहेत. आजही शरद पवार साहेबच कृषिमंत्री आहेत असे लोकांना वाटत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल एक फुल २ डाऊटफुल सरकार काहीही करत नाही. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवहेलना तर इतरांचं काय होत असेल? सरकारकडून जाहिरातींवर अमाप खर्च करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शंभर दिवस शेळीसारखं जगल्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलेले बरे, असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’