भिडे गुरुजी विकृत आहेत,त्यांची जागा तुरुंगातच; निखील वागळे कडाडले 

Mumbai – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले.

या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी यावर भाष्य केले आहे.ते म्हणाले, या भिडेंना दणकावून सांगा, हा फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या कुपमंडुकाला इथे स्थान नाही. कुंकू लाव मग तुझ्याशी बोलेन, असं वार्ताहर महिलेला सांगणारे भिडे गुरुजी विकृत आहेत. त्यांची जागा तुरुंगातच!असं वागळे यांनी म्हटलं आहे.