भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही – संजय राऊत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे (BJP) तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) दबाव टाकून भाजपने विजय मिळविल्याची टीका केली आहे. भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. असं ते म्हणाले.

पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत, तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. भाजपने माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.