राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजप खासदार लल्लू सिंह यांनी घेतलेल्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या 

अयोध्या  – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

ब्रृजभूषण सिंह यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेत राज ठाकरेंना विरोध करण्यावर शिक्कामोर्तब झालं. उत्तर भारतीय (North Indians), तसंच उत्तर प्रदेशातल्या साधू संतांची माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आल्यास..5 लाख उत्तर भारतीय विरोध करणार, असा निर्णयच उत्तर प्रदेशातल्या धर्मसंसदेत झाला. ब्रृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी अयोध्येतल्या साधू संतांनाही एकत्र आणलंय..त्यामुळं अयोध्येत यायचं असेल तर संधीचं सोनं करुन राज ठाकरेंनी माफी मागावी, असं ब्रृजभूषण म्हणतायत.

एकाबाजूला हे सर्व सुरु असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपचे खासदार लल्लू सिंह (BJP MP Lallu Singh) यांनी राज ठाकरेंच्या अयोद्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. जो कुणी श्री रामाच्या (Shree Ram) दर्शनासाठी अयोध्येत येईल त्याचं स्वागत आहे. हनुमानजींच्या (Hanumaan) कृपेने जर कुणी अयोध्येत श्री रामाच्या चरणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे. प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना आहे की राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी युक्ती देवो असंही खासदार लल्लू सिंह यांनी म्हटलं आहे