दोन बिस्किटे दिल्यावर चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव; भाजप नेत्याने दिली जुन्या वक्तव्याची आठवण करून

Bhaskar Jadhav vs Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे यांना घरकोंबडा म्हणणाऱ्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भास्कर जाधव यांनी चांगलेच सुनावले आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बावनकुळेंवर टीका करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तोंडावर लगाम लावावा, असे म्हटले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, या टीकेला आता भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आ. भास्कर जाधवांना आम्ही इंग्लडचा कुत्रा असा अरोप करत नाही कारण आमच्या वर भाजपाचे तसे संस्कार नाहीत .कार्यकर्त्याच्या पदरा आडून अरोप करणे हे जाधवांच्या नेतृत्वाला शोभत पण भास्कर जाधवांनी राज्याचा विधानसभा अधिवेशना दरम्यान भीमदेवी थाटात बोलताना स्वतःवरच आरोप केला होता. भास्कर जाधव कोण? ज्याला कोणी तरी सांगीतल, मी दोन बिस्कीट देतो जा त्याला चावून ये. लगेच धावून जाणारा आणि चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव हे सत्य त्यांनीच मांडले अशी आठवण करून देत भास्कर जाधवांना कुलकर्णी यांनी टोमणा मारला आहे.

https://youtube.com/shorts/Ju1y8hb1NHI?si=0qtW1pIMZiZwogoI

महत्वाच्या बातम्या-
कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा; धनंजय मुंडेंचे निर्देश
फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ, चित्रा वाघ यांचा इशारा