शरद पवारांच्या एन्ट्रीला अजीम-ओ-शान शहंशाह गाणं; साडेतीन जिल्ह्याचे शेहेनशाह म्हणत भाजपचे टीकास्त्र

मुंबई : काल दिल्लीत राष्ट्रववादीचं आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. हे अधिवेशन मानापमानाच्या नाट्यामुळे चांगलेच चर्चेत आले असताना आता आणखी एका मुद्द्यामुळे या अधिवेशनाची चर्चा होत आहे. या अधिवेशनात शरद पवार स्टेजवर येत असताना अजीम-ओ-शान शहंशाह गाणं (azim o shan shehanshah song) लावण्यात आलं. यावरून भाजपने राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि दिल्लीत गेलं की शहंशाहचं गुणगाणं गायचं, असं म्हणत भाजपने शरद पवारांवर निशाणा साधलाय.