World Cup: वॉटसनची चकित करणारी भविष्यवाणी, ‘या’ ४ संघांना निवडले सेमी फायनलचे दावेदार

आता भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023साठी (ICC ODI World Cup) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी मोठे भाकीत केले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने (Shane Watson) आपली मोठी भविष्यवाणी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे आणि भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरणाऱ्या चार देशांची नावे सांगितली आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनच्या मते, भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी होतील. स्टार स्पोर्ट्सवर बोलत असताना शेन वॉटसनने त्याची मोठी भविष्यवाणी (Shane Watson Prediction) केली आहे. शेन वॉटसन पुढे म्हणाला की, या चार संघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर, गेल्या काही काळापासून हे चारही संघ उपांत्य फेरीत आपले स्थान सहज पक्के करू शकतात.

न्यूझीलंड संघ बाहेर फेकला गेला
माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने सर्वांना आश्चर्यचकित केले असून त्याने टॉप 4 साठी न्यूझीलंड संघाची निवड केली नाही. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, हा सामना संघाला जिंकता आला नाही. तर 2019 च्या विश्वचषकातही न्यूझीलंड संघाने चमकदार कामगिरी केली होती आणि पुन्हा एकदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश मिळवले होते.

मात्र पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या पदरी निराशाच पडली आणि संघाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पण यावेळी किवी संघ सर्वांना चकित करून विश्वचषक विजेतेपद पटकावू शकतो. कारण संघात अनेक महान खेळाडू आहेत ज्यांची भारतीय खेळपट्ट्यांवर कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण