चंद्रकांत पाटील रामसेवेत तल्लीन, कोथरुडमधील नागरिकांना अक्षता वाटपाद्वारे निमंत्रण

Chandrakant Patil: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे आज रामसेवेत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळालं. पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील शिवपार्वत आणि गिरीजा सोसायटीतील नागरिकांच्या घरी जाऊन अक्षता वाटपाद्वारे राम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण दिले.

सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले जात आहे.

कोथरुड मध्येही प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक मंदिरांमध्ये राम प्रतिष्ठापनेवेळी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा सर्वांना पाहता यावा; यासाठी अनेक मंदिरांमध्ये एलईडीची व्यवस्था करुन लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे.

आज आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील रामभक्तीत तल्लीन झाले असून, रामसेवेत सहभाग घेत आहेत. आज कोथरुडमधील शिवपार्वती आणि गिरीजा सोसायटीतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन राम मंदिर अक्षता वाटप करुन निमंत्रण दिले. यावेळी नागरिकांकडूनही प्रभू श्रीरामांच्या आगमानाचा आनंद व्यक्त केला. पाचशे वर्षांपासून आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होत असल्याने अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”