नवराञोत्सवाची कामे २३ सप्टेबर पुर्वी पुर्ण करा – जिल्हाधिकारी

तुळजापूर – श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञउत्सव (Shree Tuljabhavani Mata’s Sharadiya Navrajan Utsav) निर्बंध मुक्त असल्याने या  कालावधीत भाविक मोठ्या संखेने येणार असल्याने नवराञोत्सव तयारी २३ सप्टेबर पर्यत पुर्ण करण्याची सुचना श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाअधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Collector Kaustubh Diwegaonkar) यांनी जिल्हाअधिकारी कार्यालयात बुधवार दि १४रोजी झालेल्या बैठकीत दिली.

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पुर्वतयारी दुसरी आढावा बैठक बुधवारी घेण्यात आली. यात प्रथम महंत पुजारी वृंदाच्या सुचना मांडल्या. नवराञोत्सवात चोवीस तास मंदीराचा जबाबदार अधिकारी नेमा अशी मागणी केली असता याचा विचार निश्चित पणे केला जाईल असे सांगितले.

नवराञोत्सवात सकाळच्या अभिषेक पुजा कालावधीत ऐक तास वाढ केला जाईल यामुळे भाविकांना नवराञोत्सवात कुलधर्मकुलाचार करण्यास सोयीचे होईल असे स्पष्ट केले. यावेळी पुर्वतयारीचा सर्व विभागाकडुन आढावा घेतला. या बैठकीला विश्वस्त तथा आ.राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) व्हिसी द्वारे सहभागी झाले होते.

नवराञोत्सव (Navaranotsav) काळात विविध धार्मिक विधीस मागील वर्षा प्रमाणे पुजारी मानकरी सेवेकरी संख्या ठेवली जाणार आहे. मागील दोन वर्षी कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर अन्नदान पाकेट मधुन केले जात होते यंदा पुर्वापरंपरे प्रमाणे मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे.

यावेळी त्यांनी संबंधित याञा विभाग प्रमुखांना पुर्वतयारी कामे लवकर २३सप्टेबर पर्यत पुर्ण करण्याची सुचना दिली व विविध झालेल्या कामांची पाहणी तहसिलदार तांदळे यांनी करावी अशी सुचना केली. शारदीयनवराञउत्सव शांततेत निर्विघ्न पणे पार पडण्यासाठी सर्वांनी  प्रशाषणाला सहकार्य करण्याचे शेवटी आवाहन केले.

यावेळी देविचे मंहत तुकोजीबुवा, मंहत हमरोजीबुवा, निवाशी अप्पर जिल्हाधिकारी स्वामी, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त रोडगे, तहसिलदार तथा विश्वस्त सौदागर तांदळे, प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार योगिता कोल्हे, पो.नी अदिनाथ काशीद, मुख्याधिकारी अरविंद नातू , डाँ एच व्ही होनमाने, जनसंपर्कअधिकारी नागेश शितोळे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम, तिन्ही पुजारी मंडळ अध्यक्ष सह पालखी वाले काठ्यावाले सह संबंधित मानकरी उपस्थितीत होते.