Crime News | भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू; राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली

Balu More: तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार (Crime News) करण्यात आला होता. त्यांचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता, या घटनेत त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान पहाटे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार (Crime News) करण्यात आला होता यानंतर प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीनं नाशिकच्या अशोका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवानं आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात बाळू मोरे यांचं वास्तव्य होतं. आनंदवाडी, शिंदी कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांच्यावर गोळीबार का झाला ? हे अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत. न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा