प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुखाचा डोंगर; ऐन तारुण्यात पतीचे झाले निधन

नवी दिल्ली-  45 वर्षीय तामिळ अभिनेत्री मीना (Tamil actress Meena) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती, विद्यासागर यांच्या निधनामुळं ती पुरती कोलमडली आहे. मीनाच्या पतीच्या निधनानंतर कलाजगतही हादरलं आहे. तिला आणि तिच्या मुलीला या आघातातून लवकरात लवकर सावरण्यासाठी बळ द्यावं अशी प्रार्थना हितचिंतकांनी केली आहे.

मीनाचे पती विद्यासागर, गेल्या काही काळापासून फुफ्फुसांच्या संक्रमणानं ग्रासले होते. कोरोनाचा संसर्ग (Corona infection) झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात विद्यासागर यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्यासागर बंगळुरूस्थित व्यावसायिक होते. 2009 मध्ये त्यांनी मीनाशी लग्न केलं होतं. या नात्यातून त्यांना नैनिका (Nainika) नावाची एक मुलगीही आहे.