Prakash Ambedkar | स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Prakash Ambedkar | स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला. ते गडचांदूर येथील सभेत बोलत होते.

भाजपचा समाचार घेताना आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे पैसे भाजपला द्या, पण मतदान देवू नका. देशाचा पंतप्रधान हा हप्ताबहादुर आहे. आरएसएसवाल्यांनो, तुम्ही याचा प्रचार करणार आहात काय ? ते मला सांगा. इथला टीव्ही मीडिया या गोष्टी बोलत नाही, पण देशाच्या बाहेर चर्चा सुरू आहे की, भारताचा पंतप्रधान हा गल्लीतला दादा आहे आणि वसुली करणारा माणूस आहे. सनातनवाल्यांना विचारतो की, असा वसुलीखोर तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहिजे का ? असा टोलाही त्यांनी लगावला.

आंबेडकर म्हणाले की, एका बाजूने चीन छाताडावर बसलाय दुसऱ्या बाजूने पाकिस्तान आहे. दर एक ते दोन दिवसात एक जवान काश्मीर खोऱ्यात शहीद होतो. पण तुम्ही कधी एक बातमी ऐकलीय का की, पाकिस्तानचा एक जवान मागच्या सहा महिन्यांत शहीद झाला आहे. 56 इंचाची छाती आता 14 इंचाची झाली आहे हे लक्षात घ्या. तो आदेश देऊ शकत नाही. मोदी आणि भाजप 150 जागा जिंकू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

ते कधीही भाजपसोबत जातील…
शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही जेव्हा म्हटलं की, आपण धर्मनिरपेक्ष मतं घेत आहोत, त्यांना आपण लिहून देऊ की, 5 वर्षे आपण भाजपसोबत जाणार नाही, तर ते ताडकन उठले आणि म्हणाले की, आम्ही लिहून देणार नाही. यांचा भाजपसोबत जाण्याचा विचार आहे हे लक्षात घ्या आणि आम्ही यांच्या सोबत युती करायची. जे धर्मनिरपेक्ष मतं घेतील आणि भाजपसोबत जातील, असेही आंबेडकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत