हरभरा, ज्वारी, मकासह गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात यंदा समाधान कारक पर्जन्यमान झालेले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उप अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या दोन योजनेंतर्गत हरभरा, ज्वारी, मका, गहू बियाणे अनुदान तत्वावर वाटप होणार आहे.

रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-202 व बीडीएनजीके-798 या वाणांचे एकूण 6291 प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. भरडधान्य योजनेंतर्गत 354 मका पिकासाठी 750/- रुपये प्रती किलो अनुदान तसेच रब्बी ज्वारी साठी रुपये 30 प्रती किलो 10 वर्षे आतील वाणासाठी 460 क्विंटल व 110 क्विंटल, 10 वर्षे वरील वाणासाठी 15 रुपये प्रती किलो अनुदान तत्वावर बियाणे वितरण होणार आहे.

तसेच सन 2021-22 बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 10 वर्षावरील जॉकी -9218 या वाणाचे एकूण 1200 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500/- प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन आहे. 5373 क्विंटल इतका गहू रुपये 1600/- प्रति क्विंटल अनुदानाने वितरीत केला जाईल. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे.

सदर अनुदान तत्वावर बियाणेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यात यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव व महाबीज यांचे अधिकृत वितरक यांच्याशी देखील संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले...

पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले…

Next Post
bombay high court

Breaking : शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी नाहीच

Related Posts
ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

Thug Sukesh Chandrashekhar: कथित ठग सुकेश चंद्रशेखर याने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रमुखाला दोन पानी पत्र लिहिले…
Read More
शरद पवार

‘बृजभूषण’ ट्रॅपमागे पवारांचा अदृष्य हात? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

मुंबई – अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे…
Read More
Eknath Shinde

शिवसेनेत शीतयुद्ध ? वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळल्याने चर्चांना उधाण

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी…
Read More