Dharavi | नव धारावीमध्ये पुनर्वसित व्यवसायास पाच वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करातून परतावा मिळणार 

मुंबई :  पुनर्विकसित धारावीमधील (Dharavi) स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि मदत करण्यासाठीपात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांनाराज्य वस्तू आणि सेवा कराचापरतावा (SGST) या सारखे फायदेमिळतील, अशी माहिती महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूहयांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) दिली आहे. प्रकल्पाच्यानिविदा अटींनुसार ही सवलत मिळणारआहे.

“पुनर्विकासामुळेधारावीतील व्यवसायांच्या अनौपचारिक स्वरूपात बदल होईल आणित्यांना भारताच्या विकास कथेचा एक भाग बनण्याचीसंधी मिळेल. या संक्रमणास हातभारलावण्यासाठी, राज्य सरकारने राज्य वस्तू व सेवाकरात (SGST) परतावादेण्यासारखे कर लाभ देऊकेले आहेत. यामुळे धारावीतील सध्याच्या तसेच नवीन व्यवसायांनामजबूत पायाभरणी करता येईल आणित्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल.यामुळे व्यवसाय अधिक स्पर्धात्मक होऊनअनेक पटींनी वाढीच्या संधी मिळतील,” असेडी आरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.

नव्यानेबांधलेल्या इमारतींना रहिवासी प्रमाणपत्र (OC) मिळाल्यानंतर कर सवलत लागूहोणार आहे.प्रकल्पाच्यानिविदा अटींनुसार, रहिवासी प्रमाणपत्र जारी केल्याच्या तारखेपासूनऔद्योगिक आणि व्यावसायिक घटकांनाराज्य सरकारच्या वित्त विभागाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (DRP/SRA) द्वारे राज्य वस्तू व सेवाकराची पाचवर्षांसाठी परतफेड केली जाईल. पात्रऔद्योगिक आणि व्यावसायिक घटकांनाया परताव्यासाठी दावा करताना पुरावाम्हणून राज्य वस्तू व सेवाकर भरल्याचातपशील द्यावा लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

धारावीमध्येकपडे (Dharavi) आणि चामड्याच्या वस्तूंचेउत्पादन करणाऱ्या हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक गाळ्यांचासमावेश होतो. त्यापैकी अनेक जगभरात विकल्याजाणाऱ्या मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचेपुरवठादार आहेत, त्याची उलाढाल लाखो डॉलर्स इतकीआहे. ते त्यांच्या व्यवसायाचास्थानिक आणि जागतिक पातळीवरविस्तार करण्यासाठी आणि त्यांना चालनादेण्यासाठी व्यवसाय वाढीस उत्सुक आहेत.

धारावीलाव्यावसायिक आणि औद्योगिक परिसरअसलेले जगाशी जोडलेले शहर बनवण्याचा DRPPLचाप्रयत्न आहे, येथील चैतन्यमयआणि अद्वितीय उद्योजकीय संस्कृती कायम ठेवतानाच धारावीकरांचेजीवनमान उंचावणे, त्यांना आर्थिक संधी उपलब्ध करूनदेणे, भविष्यकाळात उपयोगी पडेल असे शिक्षणआणि व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैलीहे सर्व धारावी आणिनव धारावी (Dharavi) येथे उपलब्ध असेल.त्यांच्याकडे सामुदायिक सभागृह, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्यान, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपनकेंद्रेदेखील असतील.

धारावीचाकेवळ अधिक चांगल्या जागेतपुनर्विकास करणे एवढेच नव्हेतर तेथील विविधतेतील एकात्मता राखून रहिवाशांसाठी दर्जेदार जीवनशैली विकसित  करणेहा प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्पएक असा मोठा बदलघडवून आणेल ज्यामुळे जगाच्याकोणत्याही भागात अशाच प्रकारच्या पुनर्विकासउपक्रमांसाठी एक आगळे उदाहरणप्रस्थापित होण्यास मदत होईल.

धारावी पुनर्विकासप्रकल्पप्रा.लि(DRPPL) विषयी-

धारावीपुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL) हा महाराष्ट्र सरकारआणि अदानी समूह यांच्यातील संयुक्तउपक्रम म्हणून तयार करण्यात आलेलाएक विशेष उद्देश प्रकल्प आहे. धारावीकरांना आधुनिकघरे उपलब्ध करून देऊन आणित्यांच्यातील उद्योजकतेची अंगभूत भावना जपून त्यांच्या जीवनातपरिवर्तन आणि सुधारणा करण्याचाDRPPL चा प्रयत्न आहे. मनुष्य केंद्रीभूतठेवून केले जाणारे हेपरिवर्तन रिकाम्या जागेची पुनर्बांधणी आणि सामुदायिक जगण्यातीलआनंदाचा पुन्हा शोध घेणारे आहे,येथे वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणिइंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यकगोष्टींची जोडणी करणे आणि कोणत्याहीनिकषावर सर्वोत्कृष्ट ठरतील अशा नागरी सुविधांसहएक स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही