विदर्भात, नाशिक परिसरात अवकाळीमुळे प्रचंड नुकसान; सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी

Vijay Vadettiwar : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी मदत जाहीर करून देखील अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही. ही मदतही तात्काळ द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी विधानसभेत केली.

चंद्रपूर, नाशिक, वर्धा, अकोला, यवतमाळ येथे अवकाळी पाऊस, गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष, संत्रा बाग, डाळिंब, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेली मदत अजूही देण्यात आली नाही. ही मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार केली. यानंतर सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही