लाईव्ह कुठे पाहायचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना? वेळेपासून ते संघापर्यंत जाणून घ्या सर्व डिटेल्स

INDvsPAK : आज (२३ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकात (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी आमने सामने येणार आहेत. उभय संघात मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ आशिया चषकातील मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर पाकिस्तानचा संघही विजयासह टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्यासाठी दम दाखवेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आतापर्यंत ११ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ८ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. टी२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये ६ सामने झाले आहेत. ज्यापैकी ५ सामने भारताने तर केवळ १ सामना पाकिस्तानने जिंकला आहे.

जाणून घेऊया सामन्याच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन (INDvsPAK Match Details) टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी सुरू होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता आहे. नाणेफेक दुपारी १:०० वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे टी२० विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह भारत आणि पाकिस्तान सामना पाहू शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह सामना कसा बघायचा?
भारतातील डिस्नी प्लस हॉटस्टार ऍपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

विनामूल्य सामना कसा पाहायचा?
हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद .
स्टँडबाय खेळाडू: उस्मान कादिर, मोहम्मद हरीस, शाहनवाज डहानी.