‘शिवसेना आणि मनसे संपली तर मुंबई एकतर गुजरातची राजधानी होईल किंवा केंद्रशासित प्रदेश’

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना इडीचे (ED) समन्स आले आहे. उद्या 11 वाजता चौकशी साठी त्यांना बोलावण्यात आलं आहे. पत्रावाला चाळ जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, अजून अशी नोटीस मिळाली नाही असं राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhari) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, सत्तेतल्या आणि विरोधातल्या कोणत्याच पक्षाबद्दल प्रेम नाही पण शिवसेना आणि मनसे (ShivSena and MNS) हे दोन पक्ष संपले तर मुंबई एकतर गुजरातची राजधानी होईल किंवा केंद्रशासित प्रदेश. म्हणून आत्ता वैचारिक विरोध असला तरी त्यांच्या पाठीशी उभं राहणं भाग आहे. सेनेनं राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवणं चुकलेलंच आहे हेही खरं असलं तरी मुंबईवर काय परिणाम होईल याचा विचार करावा लागतो. असं त्यांनी म्हटलं आहे.