कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय

सांगली – सर्वोच्च न्यायालयाने दि. 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुदान वितरीत करण्यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असणार असून ती साधारणपणे येत्या दोन आठवड्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला कळविली जाणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असणार आहे. प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी या सर्व अंमलबजावणीचे प्रमुख असणार आहेत.

सांगली जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर, सांगली मिरज रोड सांगली, दुरध्वनी क्रमांक – 0233-2600500, टोल फ्री क्रमांक – 1077.

या अनुदान वितरणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून कार्यप्रणाली प्राप्त होताच कळविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=vasFesVMcKM

Previous Post
प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा, शिवेंद्रराजेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा, शिवेंद्रराजेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

Next Post
तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एकच, आघाडीत कोणताही वाद नाही - भुजबळ

तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एकच, आघाडीत कोणताही वाद नाही – भुजबळ

Related Posts
संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, म्हणून विश्व हिंदू परिषद राबवणार 'निमंत्रण संपर्क अभियान'

संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, म्हणून विश्व हिंदू परिषद राबवणार ‘निमंत्रण संपर्क अभियान’

Ayodhya Shri Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. यानिमित्त विश्व हिंदू…
Read More
घराबाहेर लावा 'ही' झाडे, डास तर फिरकणार नाहीतच पण तुम्ही बनू शकता  करोडपती

घराबाहेर लावा ‘ही’ झाडे, डास तर फिरकणार नाहीतच पण तुम्ही बनू शकता  करोडपती

पुणे – महोगनी झाडांच्या (Mahogany tree) लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळत आहे. (mahogany tree plantation) तपकिरी लाकडासह या…
Read More
durlabh kashyap

कपाळाला तिलक…डोळ्यात सुरमा …. गुन्ह्यांसाठी जाहिराती देणाऱ्या गँगस्टर दुर्लभ कश्यपची कहाणी

उज्जैन  –  तुम्ही अनेक गुंडांच्या कथा ऐकल्या आणि वाचल्या असतील. आम्ही तुम्हाला एका अशा बदमाशाची गोष्ट सांगणार आहोत,…
Read More